जय महाराष्ट्र🚩

स्वागत आहे मित्रांनो तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन आणि मजेशीर blog मध्ये, तर मित्रांनो आज चा blog जे Instagram ला reels विडिओ बनवितात त्याच्यासाठी खुप फायदेशीर ठरणार आहे. कारण आज च्या blog मध्ये मी तुम्हाला संपुर्ण instagram reels विडिओ editing शिकवणार आहे.

Instagram Reels Editing Part 3

मित्रांनो Instagram reels विडिओ edit करण्यासाठी तुम्हाला एका अँप ची मदत घ्यावी लागेल, ज्या अँप च नाव आहे “VN” अँप तुम्ही हा अँप खाली दिलेल्या Download button वर click करून download करू शकता.

“VN” अँप download केल्यानंतर तुम्हाला या अँप ला open करून घ्यायचं आहे. अँप open केल्यानंतर तुम्हाला इथं या अँप चा मुखपृष्ठ दिसेल. तर तुम्हाला खाली दिलेल्या (+) icon वर click करायचं आहे. (+) icon वर click केल्यानंतर आता तुम्हाला इथं एक Create Project चा पर्याय मिळेल, तर तुम्हाला हा पर्याय निवडुन घ्यायचं आहे. हा पर्याय निवडल्या नंतर आता इथं तुम्हाला तो विडिओ निवडुन घ्यायचं आहे, ज्या विडिओ ला तुम्ही edit करू इच्छिता. आता आपण सर्वप्रथम इथं विडिओ ला Slow Motion मध्ये कसं edit करायचं हे बघुन घेऊ.

Instagram Reels Editing Part 3

तर इथं तुम्हाला तुमचा विडिओ एक वेळा play करून बघायचा आहे आणि त्या Point तुमचा विडिओ थांबुन घ्यायचं आहे, जिथुन तुम्हाला तुमचा विडिओ slow motion मध्ये convert करायचं आहे. त्या Point ला आल्या नंतर तुम्हाला हा विडिओ दोन भागात cut करून घ्यायचं. विडिओ cut करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या Trim पर्याय निवडायचा आहे. विडिओ cut केल्यानंतर तुम्हाला विडिओ च्या त्या भागावर यायचं आहे, ज्या भागाला तुम्ही slow motion मध्ये convert करणार आहात. विडिओ च्या त्या भागा वर आल्यानंतर आता तुम्हाला खाली दिलेला “Speed” चा पर्याय निवडायचा आहे. “Speed” चा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला सरळ रेष मिळेल आणि या रेषेवर 5 बिंदु दिसतील. तुम्ही खाली दिलेल्या image मध्ये बघु शकता.

Instagram Reels Editing Part 3

आता या रेषांना adjust करून तुम्ही तुमच्या विडिओ ची speed बदलु शकता, जसे की जर तुम्ही दिलेला बिंदु खाली कराल, तर तुमच्या विडिओ ची speed कमी होईल आणि जर तुम्ही बिंदु वर कराल तर तुमच्या विडिओ ची speed वाढेल. अशाचप्रकारे तुम्हाला तुमच्या विडिओ च्या गरजेनुसार हे बिंदु adjust करून घ्यायचे आहेत. तर मित्रांनो तुम्ही अश्याचप्रकारे तुमचे विडिओ slow motion मध्ये convert करू शकता.

Instagram Reels Editing Part 3

तर मित्रांनो आपण आपला विडिओ slow motion मध्ये convert केला आहे. आता मी तुम्हाला सांगणार आहे की, तुम्ही या विडिओ ला Shake effect कशाप्रकारे apply करू शकता. Shake effect apply करायच्या अगोदर तुम्हाला इथं तो song add करून घ्यायचं आहे. जेणेकरून इथं तुम्हाला shake effect apply करायला सोपं जाईल. तर song add करण्यासाठी तुम्हाला बाजु दिलेल्या “MUSIC” च्या icon वर click करून इथुन तुमचा song add करून घ्यायचं आहे. जर तुमच्या जवळ reels व्हिडिओ साठी dj songs नसतील, तर मी तुमच्या साठी एक special Reels Sound Pack बनविला आहे, जो तुम्ही खाली दिलेल्या download button वर click करून download करू शकता.

Song add केल्यानंतर आता तुम्हाला एक वेळा हा song ऐकून, song च्या beat नुसार तुम्हाला या विडिओ ला दोन भागांमध्ये cut करून घ्यायचं आहे (NOTE:- आपण आपल्या विडिओ ला दोन भागांमध्ये यासाठी cut करत अहो, कारण या अँप मध्ये तुम्हाला एका clip ला एकचं shake effect apply करता येत. तुम्हाला Multiple shake effect apply करण्यासाठी विडिओ ला वेगवेगळ्या part मध्ये cut करावं लागेल). आता तुम्हाला त्या clip वर यायचं आहे, ज्या clip ला तुम्हाला shake effect apply करायचं आहे. Shake effect apply करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या “FX” च्या पर्यायावर click करायचं आहे. “FX” चा पर्याय निवडल्यानंतर इथं तुम्हाला खुप effect बघायला मिळतील. तर इथुन तुम्हाला तुमच्या आवडीचे effect निवडुन घ्यायचे आहे. बाकीच्यां clip ला shake effect apply करण्यासाठी सुद्धा ह्याचं step follow करायच्या आहेत.

Shake effect apply केल्यानंतर इथं तुमचा विडिओ बनवुन तयार आहे. तर तुम्हाला हा विडिओ export करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला विडिओ बनविण्यात काही अडचण आली असेल तर तुम्ही मी YouTube ला बनविलेला विडिओ बघु शकता. Video ची link खाली दिलेली आहे👇

https://youtu.be/04FrnBUeCiQ

जर तुम्हाला काही अडचण अनुभवास आल्यास तुम्ही मला ती अडचण comment करून कळवू शकता. तुमची अडचण लवकरात लवकर दूर करण्याचा संपुर्ण प्रयत्न केला जाईल. तुमचा अमुल्य वेळ देऊन संपूर्ण blog वाचल्या बद्दल आपलं खुप खुप आभार🙏


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *