जय महाराष्ट्र🚩

स्वागत आहे वाचकांनो तुम्हा सर्वांचे माझ्या एका नविन blog मध्ये, मित्रांनो आज च्या blog मध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की, तुम्ही Old Song Beat Sync Status विडिओ कशाप्रकारे बनवु शकता. मी या blog मध्ये तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे. तर मित्रांनो हा status व्हिडिओ बनविण्यासाठी तुम्हाला हा blog शेवट पर्यंत वाचायचा आहे. आजच्या blog मध्ये मी तुम्हाला या विडिओ बद्दल च्या सर्व गोष्टी स्पष्ठ केल्या आहेत.

Old Song Beat Sync Status Editing

मित्रांनो Old Song Beat Sync status विडिओ बनविण्यासाठी तुम्हाला एका अँप ची गरज पडणार आहे, ज्याचं नाव Alight Motion आहे. जर हा अँप तुमच्या जवळ नसेल तर तुम्ही खाली दिलेल्या download button वर click करून latest 3.6.1 version चा Alight Motion download करू शकता. मी तुम्हाला 3.6.1 & above version चा Alight Motion download करायला यामुळे सांगत आहे, कारण समोर मी जे तुम्हाला project देणार आहेत ते फक्त तुम्ही Alight Motion च्या ह्याच version (म्हणजे 3.4.3 & above version) मध्येच import करू शकता. सोबतच 3.6.1 version मध्ये तुम्ही तुमचे Custom font सुद्धा add करू शकता, कारण तुमच्या अँप मध्ये जेवढे चांगले font असतील तेवढा तुमचा status विडिओ आकर्षित बनेल.

Old Song Beat Sync status विडिओ बनविण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम एक beat marked project import करावा लागेल आणि तो project तुम्ही खाली दिलेल्या button वर click करून import करू शकता. या project मध्ये मी, आपण जो song वापरणार आहोत त्या song च्या beats तुम्हाला mark करून दिल्या आहेत, ज्यामुळं तुम्हाला या song च्या beats mark करण्याची काहीच गरज नाही.

(Note📝 : PRESET link can only be import on 3.4.3 or above version of alight motion)

या beat marked project सोबतच तुम्हाला अजुन एक project import करून घ्यायचा आहे. या project मध्ये मी तुम्हाला विडिओ बनविण्यासाठी लागणारे shake effects दिले आहेत. हा project तुम्ही खाली दिलेल्या button वर click करून import करू शकता.

(Note📝 : PRESET link can only be import on 3.4.3 or above version of alight motion)

आणि जर तुम्ही Alight Motion चा 3.4.3 & above (म्हणजेच 3.6.1) version न वापरता जुना version चा वापर करत असाल तर तुम्ही खाली दिलेल्या XML link चा वापर करून हा project import करू शकता. खाली दिलेल्या link वर click केल्यानंतर तुम्हाला ही link google drive मध्ये redirect करेल आणि तिथं तुम्हाला XML file download करून import करून घ्यायची आहे.

(Note📝 : XML link can only be import on 3.3.5 3.3.0 & 3.1.4 version of alight motion)

मित्रांनो तुम्हाला वर दिलेल्या project सोबतच खाली दिलेल्या material चा वापर सुद्धा विडिओ बनवितांना करावा लागेल, तर तुम्हाला खाली दिलेले material सुद्धा download करून घ्यायचे आहे.

Materials

🌀IMP:-
जर तुम्हाला मी वापरलेले images/photos पाहिजे असतील, तर तुम्ही माझं Telegram channel join करू शकता. Telegram channel ला तुम्हाला सर्व images मिळून जातील. तुम्ही आमचं Telegram channel एकदम फ्री मध्ये join करू शकता.

मित्रांनो आता तुमच्या जवळ सर्व material आहेत, आता Old Song Beat Sync status विडिओ बनविण्यासाठी तुम्हाला फक्त खाली दिलेल्या steps follow करायच्या आहेत.

  1. सर्वप्रथम तुम्हाला import केलेला beat marked project open करून घ्यायचं आहे.
  2. Project Open केल्यानंतर आता तुम्हाला सुरवातीला येऊन Overlay video add करून घ्यायचा आहे आणि overlay video add केल्यानंतर blending & opacity चा पर्याय निवडुन या overlay ची opacity तुमच्या आवश्यकतेनुसार set करून घ्यायची आहे.
  3. यानंतर तुम्हाला पुन्हा सुरवातीला येऊन इथं मी दिलेली iPhone emoji PNG 1 add करून घ्यायची आहे आणि जी पहिली लाल line आहे तिथं पर्यंत तुम्हाला ही iPhone emoji ची layer लांबवुन घ्यायची आहे.
  4. आता तुम्हाला पहिल्या लाल line वर येऊन इथुन ते photo add करून घ्यायचे आहे, ज्या photo वर तुम्ही तुमचा status विडिओ बनविणार आहात आणि समोरच्या लाल line नंतर असलेल्या फोटो चा शिलकीचा भाग cut करून घ्यायचा आहे. आता अशाचप्रकारे तुम्हाला इथं सर्व photo add करून दोन लाल रेषेमध्ये adjust करून घ्यायचं आहे.
  5. तर मित्रांनो या project मध्ये जे long duration चे photos आहेत, त्यांना flash effect create करून घ्यायचं आहे.
  6. आता add केलेल्या सर्व फोटोंना मी दिलेल्या shake effect project मधुन shake effect copy करून add केलेल्या फोटोंना shake effect apply करून घ्यायचं आहे.
  7. आता तुम्हाला सुरवातीला येऊन मी दिलेली Light overlay व्हिडिओ add करून घ्यायची आहे आणि blending & opacity च्या button वर click करून lighten पर्याय मधील screen effect निवडुन घ्यायचं आहे. (टिप:- हा overlay विडिओ तुम्हाला 2 वेळा add करायचा आहे)
  8. यानंतर पुन्हा पहिल्या लाल रेषेवर येऊन इथं मी दिलेली iPhone emoji PNG 2 add करून, या PNG ला शेवट पर्यंत लांबवुन घ्यायचं आहे.

वर दिलेल्या सर्व step follow केल्यानंतर तुमचा विडिओ export करण्यासाठी तयार आहे, तर तुम्हाला हा विडिओ export करून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला विडिओ बनविण्यात काही अडचण आली असेल तर तुम्ही मी YouTube ला बनविलेला विडिओ बघु शकता. Video ची link खाली दिलेली आहे👇

जर तुम्हाला काही अडचण अनुभवास आल्यास तुम्ही मला ती अडचण comment करून कळवू शकता. तुमची अडचण लवकरात लवकर दूर करण्याचा संपुर्ण प्रयत्न केला जाईल. तुमचा अमुल्य वेळ देऊन संपूर्ण blog वाचल्या बद्दल आपलं खुप खुप आभार🙏


0 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *